व्यवस्थापन सांभाळण्यास कुणीच उत्तरदायी नसल्याने मंदिराचे सरकारीकरण करणार !
|
जयपूर (राजस्थान) – येथील प्रसिद्ध मेंहदीपूर बालाजी मंदिराचे महंत श्री किशोर पुरी महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर या मंदिराच्या सरकारीकरणाची सिद्धता चालू झाल्याचे सांगण्यात येत आहे. महंत श्री किशोर पुरी महाराज यांच्यानंतर मंदिराचा सांभाळ करणारा कुणी नसल्याने या मंदिराचे सरकारीकरण करण्याचा विचार सरकार करत आहे. महंत श्री किशोर पुरी महाराज आजारी असतांना मंदिराच्या व्यवस्थापनाविषयी सरकारकडे तक्रारी आल्यामुळेही सरकार असा विचार करत आहे. (केंद्रात सत्ता असतांना, तसेच अन्य राज्यांतही काँग्रेसचा अनागोंदी आणि भ्रष्ट कारभार याच्याविषयी लोकांच्या तक्रारी होत्या. जो नियम मंदिर कह्यात घेण्यासाठी काँग्रेस सरकार देत आहे, तोच नियम काँग्रेसलाही लावल्यास काँग्रेसवाल्यांना चालेल का ? – संपादक) लोकहितासाठी सरकार जम्मू येथील श्री वैष्णो देवी मंदिर मंडळाच्या धर्तीवर या मंदिराचे व्यवस्थापन सरकार हातात घेऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
#RajasthanNews: मेहंदीपुर बालाजी मंदिर के महंत किशोरपुरी महाराज की अंतिम विदाई @DausaZee @ashish982921271 #MehndipurBalaji pic.twitter.com/k87ULtzLVq
— ZEE Rajasthan (@zeerajasthan_) August 9, 2021