हिंदी महासागरातील तापमानवाढीमुळे भारतात पूरस्थिती निर्माण होणार ! – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

विज्ञानाने केलेल्या कथित प्रगतीमुळे पृथ्वीवरील वातावरणामध्ये विनाशकारी पालट झाला आहे, हे विज्ञानवादी कधी मान्य करणार ? – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – संयुक्त राष्ट्रांच्या ‘इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेन्ज’चा (‘आय.पी.सी.सी.’चा) ६ वा अहवाल ‘क्लायमेट चेंज २०२१ – दी फिजिकल सायन्स बेसिस’ प्रसिद्ध करण्यात आला. त्यात भारताविषयी चेतावणी देतांना हिंदी महासागराच्या तापमानवाढीमुळे समुद्रपातळीत वाढ होऊन किनारपट्टीच्या सखल भागांमध्ये वारंवार तीव्र पूरपरिस्थिती उद्भवेल, असे म्हटले आहे.

पृथ्वीचे तापमान वाढल्याने कुठले दुष्परिणाम जाणवतील, याविषयी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये येत्या काही दशकांत समुद्रपातळीत वाढ, वारंवार पूर, उष्णतेच्या लाटा, काही भागांत मुसळधार पाऊन आणि त्याच वेळी त्याच्याच जवळ असलेल्या भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती अशा घटनांमध्ये वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.