(म्हणे) ‘ईश्वर, धर्म आदींपासून स्वतंत्र होणे, हेच खरे स्वातंत्र्य !’

अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धेचे भंजन करायचे, हे अंनिसचे छुपे षड्यंत्र हिंदू ओळखून आहेत.

सनातनचे ४७ वे संत पू. रघुनाथ राणे (वय ८२ वर्षे) यांचा ठाणे येथे देहत्याग !

मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओझरम या गावचे रहिवासी आणि सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेले सनातनचे संत पू. रघुनाथ वामन राणे (पू. राणेआजोबा) (वय ८२ वर्षे) यांनी ११ जुलै २०२१ या दिवशी उत्तररात्री २ वाजता मुंबई येथील रुग्णालयात देहत्याग केला.

चाय पे चर्चा !

केंद्रीय मंत्रीमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यात ७ नवीन महिला मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या मंत्रीमंडळात आता एकूण ११ महिला आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने आमदार रवि राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने शिवसेनेचे मिरज तालुकाप्रमुख विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौक येथे आमदार रवि राणा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

‘लोकमत’ आणि मोहनराव शिंदे-म्हैसाळकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ७० जणांचे रक्तदान !

दैनिक ‘लोकमत’ आणि ‘मोहनराव शिंदे-म्हैसाळकर विकास प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ७० जणांनी रक्तदान केले.

ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रमात समावेश समर्थनीयच !

आता मात्र विद्यमान सरकारने हे समाजोपयोगी ज्ञान सर्वांपर्यंत कसे पोचेल ? यासाठी प्रयत्न करायला हवेत !

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या तरुणाची आत्महत्या !

मनाच्या दुर्बलतेमुळे कठीण प्रसंगाला सामोरे जाता न आल्याने मानसिक ताण येतो. मनाला सक्षम आणि कणखर करण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे. साधनेमुळे मनुष्याला आत्मबळ प्राप्त होऊन तो कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.

काँग्रेसचे खरे स्वरूप जाणा !

काँग्रेस पक्ष शतप्रतिशत हिंदुत्वाचा विरोध करणारा पक्ष आहे, असे विधान रायबरेली (उत्तरप्रदेश) येथील काँग्रेसचे आमदार राकेश सिंह यांनी केले आहे

धर्मशिक्षण न देणे आणि फाशी न देणे याला स्वातंत्र्यापासूनची सरकारे उत्तरदायी आहेत. त्यांनाही शिक्षा करा !

मृत रुग्णावर २ दिवस उपचार करून आर्थिक फसवणूक करणारे ‘आधार हेल्थ केअर’चे आधुनिक वैद्य योगेश रंगराव वाठारकर यांना ७.७.२०२१ या दिवशी अटक करण्यात आली आहे.

हिंदूंनी संघटित होऊन ‘शॅडो कॅबिनेट’प्रमाणे (विरोधकांच्या मंत्रीमंडळाप्रमाणे) प्रत्येक मंदिरात ‘शॅडो’ न्यास स्थापन करून लढा देणे आवश्यक ! – एम्. नागेश्‍वर राव, माजी प्रभारी संचालक, सीबीआय

हिंदूंवर होणार्‍या अन्यायाची जागृती व्हायला हवी.