मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज !
मनाच्या दुर्बलतेमुळे कठीण प्रसंगाला सामोरे जाता न आल्याने मानसिक ताण येतो. मनाला सक्षम आणि कणखर करण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे. साधनेमुळे मनुष्याला आत्मबळ प्राप्त होऊन तो कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.
पुणे – परदेशातील एका नामांकित आस्थापनामध्ये आय.टी. इंजिनियर असलेल्या अक्षय देवधर (वय ३६ वर्षे) याने बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बी.एम्.सी.सी.) रस्त्यावरील रहात्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तो मूळचा मुंबई येथील असून त्याने इंग्लंड येथे शिक्षण घेतले होते. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही; मात्र मानसिक तणावातून त्याने हे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. डेक्कन पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.