निधन वार्ता

घाटकोपर, मुंबई येथील सनातनच्या साधिका हेमलता कार्लेकर यांचे यजमान आणि सनातन संस्थेचे हितचिंतक विजय कार्लेकर (वय ६७ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतींचे निकाल लागण्यास आरंभ

१६ जानेवारी या दिवशी पार पडलेल्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागायला आरंभ झाला आहे. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा येथील काही निकाल आता समोर येत आहेत.

कोटीशः प्रणाम !

• श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीचा आज जत्रोत्सव !
• खानयाळे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री सातेरी दाडसाखळ देवस्थानचा आज जत्रोत्सव !

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी घाला !  

‘निधर्मी’ भारतात कुणीही ऊठसूठ हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती फोडतो, हिंदूंचे धर्मग्रंथ जाळतो, देवतांची टिंगळटवाळी करतो, वेब सिरीज, चित्रपट, नाटक, विज्ञापने यांच्या माध्यमांतून देवतांचे विडंबन करतो; पण बहुसंख्य हिंदूंना काही वाटत नाही, हे दुर्दैव !

मालवणी (मुंबई) येथे पोलिसांनी भगवान श्रीरामाची भित्तीपत्रके फाडली !

हिंदूंनो, धर्मांधांची वस्ती वाढली की काय होते, हे लक्षात घ्या ! पोलीसही धर्मांधांसमवेत हिंदूंच्या स्वातंत्र्याचा कसा गळा घोटतात, हे जाणा आणि ही स्थिती पालटण्यासाठी तुमचे प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

मेरठमध्ये गोहत्या रोखण्यास गेलेल्या पोलिसांवर धर्मांध कसायांचे प्राणघातक शस्त्रांद्वारे आक्रमण

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांध कसायांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश ! हिंसक धर्मांध महिलांचा सामना करण्यासाठी हिंदू सिद्ध आहेत ?

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यात्वाचे नेपाळकडून समर्थन !  

भारताच्या कूटनीतीक प्रयत्नांमुळे नेपाळ भारताच्या बाजूने झुकत असेल, तर ते चांगलेच आहे; मात्र नेपाळमध्ये साम्यवादी सरकार सत्तेत असेपर्यंत तेथील शासनकर्त्यांवर विश्‍वास ठेवणे धाडसाचे ठरेल, हेही तितकेच खरे !

महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाचे २० सहस्र खटले प्रलंबित आणि अनेक पदे रिक्त !

अशा आयोगाचा असून उपयोग तरी काय ? हा सरकारवर भारच आहे. असे आयोग पोसायचे तरी कशाला ? ज्या संस्था चालवता येत नसतील, तर दिखाऊपणासाठी त्या चालवणे म्हणजे सामान्य जनतेला आशेवर ठेवून तिची फसवणूक करणेच नव्हे काय ?

‘टीआरपी’ घोटाळा प्रकरणीच्या आरोपपत्रातून अर्णव गोस्वामी आणि दासगुप्ता यांचे अनेक आक्षेपार्ह संवाद उघड

गुन्हे अन्वेषण शाखेने प्रविष्ट केलेल्या या आरोपपत्रात ५०० पाने गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्या ‘चॅट’चीच आहेत. या संवादातून गोस्वामी यांना पुलवामा आक्रमण आणि एअर स्ट्राईक याची पूर्वकल्पना असल्याचे पुढे येत आहे.

नंदुरबार येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी ध्वनीक्षेपक लावल्याच्या कारणावरून पोलिसांकडून ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

मोहरम आदी प्रसंगी निघणार्‍या मिरवणुकांनी तर नंदुरबारमध्ये विक्रम स्थापित केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उघडपणे उल्लंघन करून अजान देणार्‍या भोंग्यांवरही कारवाई करण्याचे धाडस पोलिसांनी दाखवावे, अशी जनतेची अपेक्षा आहे !