मेरठमध्ये गोहत्या रोखण्यास गेलेल्या पोलिसांवर धर्मांध कसायांचे प्राणघातक शस्त्रांद्वारे आक्रमण

महिला पोलीस शिपायाच्या गळ्यात फाशीचा दोर टाकून ठार मारण्याचा प्रयत्न !

  • गोरक्षणास विरोध करणारे निधर्मीवादी हे धर्मांधांच्या या आक्रमणाविषयी कधी बोलणार ?
  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांध कसायांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
  • आता अशा कसायांनाही फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदे बनवले पाहिजेत !

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील मवाना भागामध्ये गोहत्या करण्यात येणार असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी घातलेल्या धाडीच्या वेळी धर्मांध कुटुंबाने प्राणघातक शस्त्रांसह पोलिसांवर आक्रमण केले. यात एक महिला पोलीस शिपायाच्या गळ्यात फाशीचा दोर आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. (स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? – संपादक) मात्र अन्य पोलिसांनी तिला वाचवले. पोलिसांनी या वेळी अधिक कुमक मागवून उवेश, महराज आणि आफरीन या तिघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. (अशा हिंसक धर्मांध महिलांचा सामना करण्यासाठी हिंदू सिद्ध आहेत का ? – संपादक)

वरीश कुरेशी, डिर्रा उपाख्य फिरोज कुरेशी, अमजद कुरेशी, फुरकान कुरेशी, इकराम कुरेशी, जैद कुरेशी आणि आफाक कुरेशी हे पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी येथून ४ क्विंटल गोमांस, गोमांसाचे अवशेष, हत्यारे आणि ३ दुचाकी जप्त केल्या.