मालवणी (मुंबई) येथे पोलिसांनी भगवान श्रीरामाची भित्तीपत्रके फाडली !

विहिंप कार्यकर्त्यांना मारहाण

  • पोलीस धर्मांधांना एवढे का घाबरतात ? सामाजिक शांतता राखणे, हे योग्य आहे; परंतु त्यासाठी हिंदूंना श्रीरामाची भित्तीपत्रके लावण्याची अनुमती नाकारून ती फाडायला हा पाकिस्तान आहे का ?
  • हिंदूंनो, धर्मांधांची वस्ती वाढली की काय होते, हे लक्षात घ्या ! पोलीसही धर्मांधांसमवेत हिंदूंच्या स्वातंत्र्याचा कसा गळा घोटतात, हे जाणा आणि ही स्थिती पालटण्यासाठी तुमचे प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
श्रीराममंदिराच्या निधी संकलनासाठी लावलेल्या भित्तीपत्रकांमध्ये विवादित काय असू शकते ?

मुंबई – मालवणी येथे विश्‍व हिंदु परिषदेने ‘राममंदिर समर्पण निधी अभियाना’च्या अंतर्गत लावलेली श्रीरामाचे चित्र असलेली भित्तीपत्रके (पोस्टर) मुंबई पोलीस काढून टाकत होते आणि त्या वेळी पोलिसांनी पोस्टरही फाडले. पोस्टर फाडतांना चित्रीकरण केल्याने पोलिसांनी विहिंपच्या ३ कार्यकर्त्यांवर ‘पोलीस कर्तव्य बजावतांना आडकाठी आणली’, असा आरोप करत त्यांना अटक केली. या वेळी त्यातील अधिकार्‍यांनी विहिंपच्या कार्यकर्त्यांना मारहाणही केली. सामाजिक माध्यमांवरून याविषयी पडसाद उमटत आहेत. श्रीराममंदिर उभारण्यासाठी निधी संकलनाची मोहीम विहिंपच्या वतीने देशभर राबवण्यात येत आहे. १५ जानेवारी या दिवशी शुक्रवारी विहिंपचे कार्यकर्ते निधी संकलन करून या भागातून परतत असतांना ही घटना घडली.

मुंबई पोलिसांना याविषयी विचारल्यावर त्यांनी ‘हे पोस्टर भावना भडकावणारे आणि विवादित असून ते काढण्याचा आम्हाला आदेश आहे’, असे त्यांनी विहिंपच्या कार्यकर्त्यांना सांगितले. (श्रीराममंदिराच्या निधी संकलनासाठी लावलेल्या भित्तीपत्रकांमध्ये विवादित काय असू शकते ? देशभर अशी भित्तीपत्रके लागली आहेत ! – संपादक)

विहिंप आणि संघ यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी केल्यावर पहाटे ४ वाजता साहाय्यक पोलीस आयुक्तांनी कार्यकर्त्यांवरील आरोप मागे घेण्याचे आश्‍वासन दिले आणि त्यांना सोडून दिले. भित्तीपत्रके फाडणार्‍या पोलिसांवर कारवाई करण्यात करण्याचेही आश्‍वासन त्यांनी दिले.

प्रभु श्रीरामाचे पोस्टर लावणे अपराध; मात्र मशिदींवरील भोंग्यावर कारवाई नाही ! – मंगलप्रभात लोढा, भाजप

‘प्रभु श्रीरामाचे पोस्टर लावणे अपराध होत असून मालवणीची परिस्थिती गंभीर होत आहे.

या ठिकाणी प्रचंड मोठ्या आवाजात मशिदींवर भोंगे लावले जातात. त्याविषयीच्या तक्रारीवर अद्याप काहीही कारवाई झालेली नाही’, असे ट्वीट मुंबईचे भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.