दैनिक ‘जनशक्ती’चे संपादक तथा उद्योजक कुंदन ढाके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन

कुंदन दत्तात्रय ढाके

चिंचवड – पिंपरी चिंचवड आणि पुण्यात लोकमान्यता पावलेले दैनिक ‘जनशक्ती’ आणि दैनिक ‘लेवाशक्ती’चे संपादक कुंदन दत्तात्रय ढाके (वय ४२ वर्षे) यांचे २८ डिसेंबर या दिवशी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळगावी होणार आहे.

ते प्रसिद्ध ‘सिद्धीविनायक ग्रूप’चे संचालक होते. वर्ष २०१४ मध्ये दैनिक ‘जनशक्ती’च्या माध्यमातून त्यांनी मीडिया क्षेत्रात प्रवेश केला. आज जनशक्तीचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे. इलेक्ट्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या कुंदन ढाके यांचे पुण्यात बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय काम आहे. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेणारे एकनाथ खडसे यांचे जवळचे सहकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे.