अधिवक्ता महमूद प्रचा यांच्या कार्यालयावर पोलिसांची धाड

देहली दंगलीतील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी त्यांनी खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे या आरोपीला खोटी जबानी देण्यास बाध्य केले. तसेच अन्य एका अधिवक्त्याच्या हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले जो ३ वर्षांपूर्वीच मृत पावला होता.

बांगलादेशात फाशी ठोठावलेल्या गुन्हेगाराला १० वर्षांनंतर देहलीत अटक !

बांगलादेशातील गुन्हेगार हे घुसखोरी करून भारतात येऊन लपून रहातात; मात्र भारतीय सुरक्षायंत्रणा आणि पोलीस झोपलेले असल्याने त्यांचे फावते, हेच यातून लक्षात येते ! घुसखोरांसह अशांवरही कारवाई आवश्यक !  

उत्तरप्रदेशात एका मासात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याच्या अंतर्गत ३५ जणांना अटक !

एका राज्यात केवळ एका मासात ३५ जणांना अटक होते, याचा अर्थ हे लोण किती मोठ्या प्रमाणात पसरले आहे, हे लक्षात येते. केंद्र सरकारने लवकरात लवकर देशस्तरावर असा कायदा करून हिंदु तरुणींना न्याय द्यावा, अशीच हिंदूंची अपेक्षा !

प्रसिद्धीपत्रकांमध्ये मराठीचा वापर बंधनकारक करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू !

यापूर्वी राज्यशासनाने रेल्वे प्रशासनाला मराठी भाषेचा उपयोग करण्याविषयी वारंवार सूचना दिल्या आहेत. असे असतांना त्याकडे दुर्लक्ष करणे, हा रेल्वे प्रशासनाचा उद्दामपणा म्हणावा कि मराठीद्वेष ?

खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स

४ वर्षांपूर्वी ‘पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र बँके’मध्ये ३५० कोटी रुपयांचा अपहार झाला होता. यामध्ये काही रक्कम सौ. वर्षा राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्या खात्यात जमा झाल्याविषयी चौकशी करण्यासाठी त्यांना समन्स पाठवण्यात आला आहे.

श्री दत्तजयंती निमित्त २९ आणि ३० डिसेंबरला देवगडकडे (जिल्हा नगर) जाणारे रस्ते बंद रहाणार !

दत्त जन्म सोहळ्याचे विविध दूरचित्रवाहिन्या आणि फेसबूकद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्या विरोधात न्यायालयात याचिका करण्याचा विचार करणार आहे ! – अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिघेही केंद्रीय यंत्रणांचा चुकीचा उपयोग करत आहेत. अन्वेषण यंत्रणांचा चुकीचा वापर होत असेल, तर अंमलबजावणी संचालयालय आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करायला हवी.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध

आमदारांच्या या घोषणा लोकशाही प्रक्रियेला नखे लावत आहेत ?, असा प्रश्‍न उपस्थित करत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या निर्णयाला विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते विरोध करत आहेत.

गेंडुरझरिया (जिल्हा गोंदिया) परिसरात नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला !

नक्षलवाद नष्ट केल्याविना अशा घटना कायमस्वरूपी संपणार नाहीत. त्या दृष्टीने शासनाने ठोस कृती करायला हवी !

चारकोप (मुंबई) येथील मंदिराला लागलेल्या भीषण आगीत २ जणांचा होरपळून मृत्यू

कांदिवलीतील चारकोप येथील साईबाबा मंदिरात २७ डिसेंबरला पहाटे ३ वाजता ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागलेल्या आगीमध्ये २ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर घायाळ झाले आहेत. सुभाष खोडे आणि युवराज पवार अशी मृतांची नावे आहेत.