नेपाळमध्ये स्वतःची बाजू पुन्हा भक्कम करण्यासाठी चीनचे ४ नेते नेपाळमध्ये !

चीनची प्रत्येक चाल उधळून लावण्यासाठी भारताने प्रयत्न केला पाहिजे !

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली

काठमांडू (नेपाळ) – नेपाळची संसद विसर्जित करण्यात आल्याने चीनला झटका बसला आहे. त्यामुळे चीनने नेपाळ कम्युनिस्ट पक्षात फूट पडू नये, यासाठी त्याच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षातील ४ वरिष्ठ नेत्यांना नेपाळमध्ये पाठवले आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयक आघाडीचे उपमंत्री कुओ येचौ हे नेपाळमध्ये जात आहेत.

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्यातील वादामुळे पक्षात फूट अटळ आहे. प्रचंड यांनी काही दिवसांपूर्वी ओली यांची कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर ओली यांनी नेपाळ संसद विसर्जित करून निवडणुकीची घोषणा केली. या पार्श्‍वभूमीवर नेपाळमधील चीनच्या राजदूत होऊ यांकी यांनी दोन्ही गटाच्या नेत्यांची भेट घेऊन वाद टाळण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला यश आले नाही. त्यानंतर होऊ यांनी तसा अहवाल चीनच्या नेत्यांना पाठवला. त्यानंतर चीनने त्याचे ४ नेते नेपाळमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला.