(म्हणे) ‘मी चाकूद्वारे पंतप्रधान मोदी यांना मारेन !’ – शेतकरी आंदोलनामधील एका महिलेची धमकी

  • शेतकरी आंदोलन कोणत्या दिशेने जात आहे, हेच यातून लक्षात येते !
  • सरकारने अशांना शोधून त्यांच्यावर तात्काळ  कारवाई करणे आवश्यक आहे आणि याप्रकरणी शेतकरी संघटनांनीही स्पष्टीकरण द्यायला हवे !
किसान संघाच्या नेत्याची पत्नी

नवी देहली – देहलीतील सीमेवर गेल्या मासाभरापासून शेतकर्‍यांकडून कृषी कायदे रहित करण्यासाठी आंदोलन केले जात आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसिरित झाला आहे. यात एक महिला तिच्या हातातील चाकूद्वारे पंतप्रधान मोदी यांना मारण्याची धमकी देतांना दिसत आहे.

१. आंदोलनाच्या ठिकाणी एका पत्रकाराने या महिलेशी संपर्क करून तिचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तिने ही धमकी दिली. या वेळी या पत्रकाराने हे सूत्र गांभीर्याने न घेता, ‘यावरून लक्षात येते की, लोकांमध्ये सरकारच्या विरोधात किती संताप आहे’,  असे हसत म्हणतांना दिसत आहे. (असे जनताद्रोही पत्रकार समाजाला काय दिशादर्शन करणार ? – संपादक)

 (सौजन्य : National Dastak)

२. यापूर्वीही शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा अशाच प्रकारचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्यात काही महिला ‘मोदी तू मर’ अशा प्रकारच्या घोषणा देत असतांना दिसत होती.