सीबीआयने अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांची हत्या कि आत्महत्या याच्या अन्वेषणाचे निष्कर्ष घोषित करावेत ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

मुंबई – सीबीआयने अभिनेते सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या अन्वेषणास प्रारंभ करून आता जवळपास ५ मास झाले आहेत; मात्र त्याची हत्या झाली होती कि त्याने आत्महत्या केली ? याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही.

मी सीबीआयला विनंती करतो की, तिने लवकरात लवकर अन्वेषणाचे निष्कर्ष घोषित करावेत, असे आवाहन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.