आंदोलन शेतकर्‍यांचे !

चर्चा करून मध्यम मार्ग काढता येईल, त्यात पालट करता येईल’, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे, तर शेतकर्‍यांचे म्हणणे आहे, ‘हे कायदेच रहित करावे. आम्हाला यावर चर्चा करायची नाही.’ म्हणजे शेतकर्‍यांची टोकाची भूमिका आहे, तर सरकार ते मान्य करायला सिद्ध नाही. त्यामुळे हे आंदोलन चालू आहे.

प्राप्तीकर विभागाचे निरीक्षक प्रताप चव्हाण १० लाख रुपयांची लाच घेतांना कह्यात

एका आधुनिक वैद्यांकडून धाड न टाकण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेतांना प्राप्तीकर विभागाचे निरीक्षक प्रताप चव्हाण यांना लक्ष्मीपुरी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले. 

श्रीलंकेपासून शिका, तर चीनपासून सावध रहा ! – भारताची नेपाळला चेतावणी  

नेपाळनेच नाही, तर भारतानेही सावध रहाण्याची आवश्यकता आहे ! तसे न राहिल्यानेच चीनने पेंगाँग तलावाजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी केली आहे, ही वस्तूस्थिती आहे !

पलक्कड (केरळ) नगरपालिकेवर ‘जय श्रीराम’ लिहिलेला फलक फडकावल्यावरून भाजपवर गुन्हा नोंद

पलक्कड नगरपालिकेवर विजय मिळवल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयावर ‘जय श्रीराम’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ लिहिलेले फलक लावल्याने पालिका सचिवांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कर्नाटकातील ६ वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातील ब्राह्मणांच्या भावना दुखावणारा धडा भाजप सरकार हटवणार

७ वीच्या पुस्तकातून टिपू सुलतानवरील धडा हटवण्यात आला होता.

करण जोहर यांच्या घरी झालेल्या पार्टीची अमली पदार्थविरोधी पथक पुन्हा चौकशी करणार

करण जोहर यांना १६ डिसेंबर या दिवशी अमली पदार्थविरोधी पथकाकडून समन्स देण्यात आले आहे.

लाच स्वीकारणार्‍या पिंपरी येथील महिला पोलीस निलंबित

पुरुषांच्या समवेत आता महिलाही लाच घेण्यात कचरत नाहीत. यावरून समाजाचे किती अधःपतन होत आहे, हेच लक्षात येते !

श्री महालक्ष्मी मंदिराच्या शिखरावर ५ फूट उंचीचा १ हजार टनचा धोकादायक कोबा ! – महेश जाधव, अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

५० वर्षांपूर्वी योग्य वाटेल त्या पद्धतीने त्यांनी मंदिरातील गळती थांबवण्यासाठी प्रयत्न केला असेल. परंतु आता ही स्थिती अधिक धोकादायक वळणावर आली आहे !

गैरप्रकारांना अनुसरून ‘बी.एल्.ओ.’मध्ये पालट करण्याचा मुख्य निवडणूक अधिकार्‍यांचा आदेश

गैरप्रकार झाल्यावरून ‘बूथ लेव्हल ऑफिसर’मध्ये (बी.एल्.ओ.) पालट करण्याचा आदेश मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी दक्षिण गोवा जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांना दिला आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध आमदारांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री. सागर चोपदार आणि श्री. सतीश सोनार यांनी विविध आमदारांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट दिले.