मुंबई – चित्रपट दिग्दर्शक करण जोहर यांच्या घरी वर्ष २०१९ मध्ये झालेल्या पार्टीची अमली पदार्थविरोधी पथकाकडून पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी करण जोहर यांना १६ डिसेंबर या दिवशी अमली पदार्थविरोधी पथकाकडून समन्स देण्यात आले आहे.
The NCB issued a notice to Karan Johar on Thursday over a viral video allegedly showing drugs being consumed at his house party last year.https://t.co/iP05XXZIU0
— News18.com (@news18dotcom) December 19, 2020
२८ जुलै २०१९ या दिवशी करण जोहर यांच्या घरी झालेल्या पार्टीचा एक व्हिडिओ त्यांनी स्वत: सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित केला होता. यामध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार उपस्थित होते. व्हिडिओमध्ये कलाकार नशेत असल्याचे दिसून येत आहे; मात्र करण जोहर यांनी ‘या पार्टीमध्ये अमली पदार्थांचा उपयोग करण्यात आला नव्हता’, असे यापूर्वी घोषित केले आहे. यापूर्वीही अमली पदार्थविरोधी पथकाकडून या पार्टीविषयी चौकशी करण्यात आली होती. करण जोहर यांच्या ‘धर्मा प्रोडक्शन’चे कार्यकारी दिग्दर्शक क्षितिज प्रसाद यांना अटकही करण्यात आली होती.