पलक्कड (केरळ) नगरपालिकेवर ‘जय श्रीराम’ लिहिलेला फलक फडकावल्यावरून भाजपवर गुन्हा नोंद

असे व्हायला केरळ भारतात आहे कि पाकमध्ये ?

पलक्कड (केरळ) नगरपालिकेवर फडकवलेला फलक

पलक्कड (केरळ) – केरळमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. यात भाजपला चांगल्या प्रकारे यश मिळाले. भाजपने २ नगरपालिका आणि २४ ग्रामपंचायींमध्ये सत्ता मिळवली आहे. पलक्कड नगरपालिकेवर विजय मिळवल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयावर ‘जय श्रीराम’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ लिहिलेले फलक लावल्याने पालिका सचिवांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

१. काँग्रेसचे जिल्हा समिती अध्यक्ष व्ही.के. श्रीकांतन् यांनी म्हटले की, यात जे सहभागी झाले होते, त्यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे.

२. माकपचे नेते टी.के. नौशाद यांनी म्हटले की, भाजपने रा.स्व. संघाच्या साथीने हे कृत्य केले आहे.

. भाजपचे जिल्हाध्यक्ष ई. कृष्णादास यांनी आरोपांवर उत्तर देतांना म्हटले की, पक्षाला या घटनेची कोणतीही माहिती नाही. माहिती मिळाल्यानंतर आम्ही ते फलक काढून टाकले. घटनेच्या वेळी १ सहस्र ५०० कार्यकर्ते तेथे उपस्थित होते. त्यातील कोण इमारतीवर चढले होते, याची आम्हाला माहिती नव्हती. तसेच अशा वेळी पोलिसांनीही सतर्क रहायला हवे होते.