
मुंबई – हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे ओबीसी आणि धनगर आरक्षणाच्या सूत्राकडे लक्ष वेधण्यासाठी गळ्यात ढोल बांधून सभागृह परिसरात पोचले; मात्र पोलिसांनी त्यांना सभागृहाबाहेर अडवले. पोलिसांनी पडळकर यांनी पाठीवर लावलेला मागण्यांचा फलक काढून मोडून टाकला. या वेळी पडळकर म्हणाले की, हे सरकार झोपले आहे त्यामुळे धनगर समाजाचे श्रद्धास्थान असणारा ढोल वाजवून त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला. आमची ही लोककला आहे, पोलिसांनी सरकारच्या सूचनेनुसार मला रोखले. मी सरकारचा निषेध करतो.
आमदार गोपीचंद पडळकरांनी सरकारवर केलेले आरोप

१. धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी या सरकारने एकही बैठक घेतलेली नाही. तत्कालीन फडणवीस सरकारने १ सहस्र कोटी रुपयांपैकी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यातला १ रुपयाही धनगर समाजाला या सरकारने दिलेला नाही.
२. धनगरांचा अभिमान, स्वाभिमान आणि भावना यांच्याशी हे सरकार खेळत आहे. त्यामुळे मंत्र्यांना गावागावांत फिरणेही कठीण होईल. विश्वासघात करून सत्तेत आलेले सरकार महाराष्ट्रातील गोरगरिबांशी खेळत आहे.
Dhruv Rathee Video : ‘हिंदूंचे देवता मांस खायचे आणि दारू प्यायचे’ असे म्हणणारा ध्रुव राठी याचा व्हिडिओ २४ घंट्यांत हटवा !
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री