फरीदाबाद आणि मथुरा येथील ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने फरीदाबाद येथे सेक्टर २८ मधील शिवशक्ती मंदिर आणि ग्रेटर फरीदाबाद येथील एस्.आर्.एस्. रेसिडेन्सी सेक्टर ८८ मधील शिवमंदिर या ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.

हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना आमचे सदैव सहकार्य राहील ! – प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी

प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी हरिद्वार येथील श्री स्वामीनारायण आश्रमाचे संस्थापक आहेत. या आश्रमामध्ये वेदपाठशाळा, यज्ञशाळा आणि अन्नछत्र चालवले जाते.

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या !

देशात पुरो(अधो)गाम्यांच्या हत्या झाल्यावर देशातील सर्वच राजकीय पक्ष आवाज उठवतात; मात्र हिंदुत्वनिष्ठांच्या किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्यावर कुणीही बोलत नाहीत, हा त्यांचा ढोंगीपणाच होय !

श्री जगन्नाथ मंदिराची ३५ सहस्र एकर भूमी विकण्याचे वृत्त पूर्णतः चुकीचे ! – मंदिर प्रशासनाचे स्पष्टीकरण

श्री जगन्नाथ मंदिराची भूमी विकण्याचे वृत्त पूर्णपणे खोटे आहे. प्रसारमाध्यमांनी याला चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केले आहे.

देशातील ४२ सहस्र शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची, तर १५ सहस्र शाळांमध्ये शौचालयांची सोय नाही ! – केंद सरकारची माहिती

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही अशी स्थिती असणे हे आतापर्यंतच्या  शासनकर्त्यांना लज्जास्पद ! सरकारने ही स्थिती सुधारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत !

विद्यार्थ्यांना श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची पूजा न करण्याची अन् हिंदु धर्माचे पालन न करण्याची दिली शपथ !

सरकारी समितीच्या सचिवपदी असलेल्या आयपीएस् अधिकार्‍याने विद्यार्थ्यांना अशी शपथ देणे; म्हणजे ‘तेलंगाणा राष्ट्र समिती सरकारकडून सरकारीयंत्रणांचा वापर करून चालवण्यात आलेला हा हिंदुविरोधी उपक्रम !

प्रयागराज पोलीस महानिरीक्षकांकडून रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत भोंगे लावण्यावर बंदीचा आदेश !

भोंग्यांच्या वापरावर बंदी आहे हे पोलिसांच्या लक्षात येऊनही ते ‘मशीद आहे’ म्हणून नेहमीप्रमाणे धर्मांधांना घाबरून शेपूट घालत आहेत.

मालवण येथील पारंपरिक मासेमारांचे साखळी उपोषण चालूच मासे खरेदी-विक्री बंद

सागरी पर्यटन व्यावसायिकांचा मालवणमध्ये कडकडीत बंद

कळंगुट येथील भारतातील पहिल्या ‘सेक्स टॉय शॉप’ प्रकरणी चौकशी करण्यात यावी ! – ‘गोवा वुमन्स फोरम’ची मागणी

गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्याने अशा प्रकारचे ‘सेक्स टॉय शॉप’ उघडले आहे, या बातमीमुळे गोवा शासनाने असे दुकान उघडण्यास अनुज्ञप्ती दिली आहे, असा अर्थ होतो.’’

कर्नाटकने पाणी वळवल्याने म्हादई नदीचे २० किलोमीटर अंतरापर्यंतचे पात्र कोरडे !  सुदिन ढवळीकर

म्हादई नदी आता आमच्या हातात राहिलेली नाही. या नदीचे पाणी कळसा भंडुरा प्रकल्पाद्वारे मलप्रभा नदीत वळवण्यात आले आहे.