प्रयागराज पोलीस महानिरीक्षकांकडून रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत भोंगे लावण्यावर बंदीचा आदेश !

यात नवीन काय आहे ? सर्वोच्च न्यायालयानेच अशी बंदी घातली आहे आणि त्याचे पालन होत नाही, हे पोलिसांच्या लक्षात येत नाही, ही चूक आहे किंवा पोलिसांच्या लक्षात येऊनही ते ‘मशीद आहे’ म्हणून नेहमीप्रमाणे धर्मांधांना घाबरून शेपूट घालत आहेत. अशा पोलिसांवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कारवाई केली पाहिजे आणि समाजामध्ये शांतता राखली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरु प्रा. संगीता श्रीवास्तव यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून तक्रार केल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे.

प्रयागराजच्या पोलीस महानिरीक्षकांनी जिल्हा दंडाधिकार्‍यांना ‘रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत भोंग्यांच्या वापरावर बंदी असेल, याची काळजी घ्यावी’, असे सांगितले आहे.

जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात पोलीस महानिरीक्षक के.पी. सिंह यांनी अधिकार्‍यांना सर्वोच्च न्यायालय आणि अलाहाबाद उच्च न्यायालय यांच्या आदेशांची कार्यवाही करण्यास सांगितले आहे.