फरीदाबाद आणि मथुरा येथील ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने फरीदाबाद येथे ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन

प्रतिकात्मक छायाचित्र

फरीदाबाद (हरियाणा) – महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच येथील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी जिज्ञासूंकडून शिवाचा नामजप करून घेण्यात आला.

फरीदाबाद आणि मथुरा येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने फरीदाबाद येथे सेक्टर २८ मधील शिवशक्ती मंदिर आणि ग्रेटर फरीदाबाद येथील एस्.आर्.एस्. रेसिडेन्सी सेक्टर ८८ मधील शिवमंदिर या ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. याचसमवेत मथुरा येथील गतैश्‍वर मंदिर येथेही ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनांचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.