‘एन्आयए’ला आणण्याची घाई करायला नको होती ! – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत

एन्आयएकडे अन्वेषण गेल्याने राज्य सरकारला धक्का वगैरे बसलेला नाही. त्यांना जे अन्वेषण करायचे, ते करू दे. कुणीही आले आणि कोणत्याही पद्धतीने अन्वेषण केले, तरी सत्य बाहेर येईलच. ‘महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत’, असेही ते म्हणाले.

भूमीच्या अतिक्रमणावरून मेजर जनरल आणि मालमत्ता अधिकारी यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या कारावासाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

केंद्रशासनाने वीर राघव रेड्डी यांच्या विरुद्ध सैन्याच्या ९ एकर भूमीवर अतिक्रमण करून ती बळकावली आहे, असा दिवाणी दावा केला.

भारतियांना धर्मापासून वेगळे करता येणार नाही ! – अभिनेत्री प्रियांका चोप्रा

ओपरा विनफ्रे यांनी प्रियांकाला तिच्या आयुष्यात धार्मिकतेला किती महत्त्व आहे, असा प्रश्‍न विचारला होता. त्यावर तिने हे उत्तर दिले.

भाजपशी सर्व सूत्रांवर सहमत नाही ! – भाजपचे उमेदवार ई. श्रीधरन्

‘मेट्रो मॅन’ म्हणून ओळखले जाणारे आणि आता केरळमधील भाजपचे उमेदवार ई. श्रीधरन् यांनी, ‘भाजपच्या सर्व सूत्रांशी मी सहमत नाही. काही काही सूत्रांवरील असहमती न पहाता आपल्याला समग्रपणे एखाद्या प्रकरणाकडे पहावे लागेल’, असे एका मुलाखतीत म्हटले आहे.

‘व्हॉट्सअ‍ॅप’चे गोपनीयता धोरण रोखण्यात यावे !

व्हॉट्सअ‍ॅप हे धोरण १५ मेपासून सर्व वापरकर्त्यांना अनिवार्य करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या गोपनीयता धोरणाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

देहली येथे तंदूर रोटी बनवतांना त्यावर थुंकणार्‍या दोघा धर्मांधांना अटक

अशा धर्मांधांना अनेक दिवस उपाशी ठेवण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

हरिद्वारमधील हरिपूर कला येथील रस्त्यांसह सप्त सरोवर रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे भाविकांमध्ये संताप !

कुंभसारख्या मोठ्या सोहळ्याची उत्तराखंड प्रशासनाने कशा प्रकारे सिद्धता केली आहे, हेच यातून दिसून येते. आता सरकारने यात हस्तक्षेप करून प्रशासनातील संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !

आणखी किती पिढ्या आरक्षण चालू रहाणार ?

सोनाराने कान टोचललेलेे नेहमीच चांगले असते ! असे प्रश्‍न अन्य कुणी उपस्थित केला असता, तर त्याला ‘सनातनी’ म्हटले गेले असते ! आता न्यायालयाने देशातील आरक्षणाचे पुनर्विलोकन करून ‘देशात खरेच आरक्षणाची आवश्यकता आहे का ?’ याचा निर्णय घ्यावा !

पुरातत्व विभागाच्या हलगर्जीमुळे ओडिशातील ऐतिहासिक २ खांब तुटले !

भारतातील हिंदूंची पुरातन धार्मिक स्थळे, मंदिरे आदींची हेळसांड झाल्यामुळे त्यांची दुरवस्था झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू यांविषयी संवेदनशून्य आणि गांभीर्य नसलेला हा विभाग विसर्जित करून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची संपत्ती ५ वर्षांत १ लाखाहून थेट ४१ लाखांवर पोचली !

असा ‘चमत्कार’ भारतात राजकारण्यांच्या संदर्भात नेहमीच होत असतो आणि जनतेलाही ते अपेक्षित असते ! जर असे झाले नाही, तर ते आश्‍चर्यच ठरते ! असे ‘चमत्कार’ रोखण्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था हवी !