देहली येथे तंदूर रोटी बनवतांना त्यावर थुंकणार्‍या दोघा धर्मांधांना अटक

  • अशा धर्मांधांना अनेक दिवस उपाशी ठेवण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !
  • सध्या धर्मांधांकडून ठिकठिकाणी तंदूर बनवतांना त्यावर थुंकण्याची कृती समोर येत आहे. त्याविषयी व्हिडिओ प्रसारित झाल्यावर संबंधितांना अटक करण्यात येत आहे; मात्र ‘असे करणयामागे काही व्यापक षड्यंत्र आहे का’ किंवा ‘तंदूर बनवतांना त्यावर का थुंकण्यात येत आहे’, यामागील हेतू जाणून त्याविषयी जनतेला अवगत करणे अन्वेषणयंत्रणांकडून अपेक्षित आहे !

नवी देहली – उत्तरप्रदेशातील मेरठ आणि गाझियाबाद येथे काही दिवसापूर्वी तंदूर रोटी बनवतांना त्यावर थुंकण्याचे प्रकार उघडकीस आले होते. असे करणार्‍या धर्मांधांना अटकही करण्यात आली होती. तरीही असे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.  आता देशाची राजधानी देहलीमध्येही असाच प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघा धर्मांधांना अटक केली आहे.

 (सौजन्य : India Today Social)

देहलीतील ख्याला भागातील चांद हॉटेलमध्ये दोघे जण भट्टीवर तंदूर रोटी बनवत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. यात एकजण तंदूर रोटी बनवून ती भट्टीमध्ये टाकण्यापूर्वी त्यावर थुकंत असल्याचे दिसून आल्यावर याविषयी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर महंमद इब्राहिम आणि साबी अनवर या दोघांना अटक करण्यात आली. ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला त्या हॉटेलकडे अधिकृत परवाना नसल्याचे समोर आले आहे. परवाना नसल्यामुळे हॉटेल मालकावरसुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.