नवी देहली – माझे वडील मशिदीत गाणे गाण्यासाठी जायचे. त्यामुळे मला इस्लाम धर्माविषयी ठाऊक होते. मी एका कॉन्व्हेन्ट शाळेत शिकले. त्यामुळे मला ख्रिस्ती धर्माविषयीही ठाऊक आहे. मी स्वतः हिंदु असल्याने माझ्या घरात हिंदु संस्कृती जपली गेली. तुम्ही धर्माला भारतापासून वेगळे करू शकत नाही. धर्म हा भारताचा पुष्कळ मोठा भाग आहे. माझ्या वडिलांनी आम्हाला सर्व धर्मांना मानण्याची शिकवण दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘प्रत्येक धर्माचा मार्ग एकाच ईश्वरापर्यंत जातो.’ माझ्याही घरी मंदिर आहे. मीही प्रतिदिन पूजा करते, अशी माहिती अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने हॉलिवूडच्या प्रसिद्ध लेखिका, निवेदिका असणार्या ओपरा विनफ्रे यांना दिलेल्या मुलाखतीत दिली. ओपरा विनफ्रे यांनी प्रियांकाला तिच्या आयुष्यात धार्मिकतेला किती महत्त्व आहे, असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिने हे उत्तर दिले.
Promo of #PriyankaChopra‘s interview with #OprahWinfrey OUT, actress talks about memoir ‘Unfinished’@priyankachopra @Oprah https://t.co/z3Y8tCwVV2
— India TV (@indiatvnews) March 18, 2021