केरळमध्ये भाजपचा उमदेवार आक्रमणात घायाळ

हिंदूंनी मतपेटीद्वारे साम्यवादी सरकारला त्याची जागा दाखवून देणे अपेक्षित आहे !

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहा १०० कोटी रुपयांची मागणी केली होती ! 

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका गृहमंत्र्यावर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने अशा प्रकारच्या खंडणीचा केला आरोप ! आरोप गंभीर असल्याने त्याची नोंद घेऊन मुख्यमंत्र्यांनी याविषयी जनतेला वस्तूस्थिती सांगणे आवश्यक !

कोल्लूरू मुकांबिका मंदिर व्यवस्थापनाने केलेल्या अपव्यवहाराच्या अन्वेषणामध्ये मंदिर महासंघालाही सहभागी करून घ्यावे ! – गुरुप्रसाद गौडा, प्रवक्ते, मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक

अन्वेषणात पारदर्शकता असायला हवी आणि अपव्यवहार करणार्‍या भ्रष्ट अधिकार्‍यांना एका दिवसात ‘क्लिन चीट’ देऊन बाहेर पडण्यापासून रोखता यावे, यासाठी या अन्वेषणात भक्तांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.

विशाळगडावरील अतिक्रमणाची गडावर जाऊन पहाणी करणार ! – कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीला आश्‍वासन

विशाळगडावरील अतिक्रमण हटवून दोषींवर कारवाई करावी,यासाठी कोल्हापूर, सातारा, जळगाव, धुळे आणि यावल येथे दिले निवेदन

लेखक आणि उद्योजक शरद तांदळे यांच्यावर सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी

स्वतःला तथाकथित उद्योजक म्हणवणारे शरद तांदळे यांचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाला असून यामध्ये त्यांनी हरिपाठ, पारायण, कीर्तन परंपरा यांची विटंबना करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

पुण्यात पीएमपी ५० टक्के प्रवाशांनाच अनुमती

बसमध्ये १७ ते २१ इतकेच प्रवासीच बसू शकतील. या सर्व डेपोच्या व्यवस्थापकांना बसमध्ये सुरक्षित अंतर राखणे आणि सॅनिटायझेशन यांविषयीच्या सूचना दिल्या आहे.

रेमडेसिव्हिर इंजेक्शनची विक्री छापील किमतीवर करू नका ! – अन्न आणि औषध प्रशासनाची (एफ्.डी.ए.ची) किरकोळ औषध विक्रेत्यांना सूचना

वेगवेगळ्या आस्थापनांनी उत्पादित केलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन विविध किमतींना शहरात विकले जात असल्याचे निदर्शनात आले होते. सध्या कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन या इंजेक्शनची किंमत नियंत्रित करून ती दीड सहस्र रुपयांपर्यंत अल्प करण्याच्या हालचाली प्रशासनाने चालू केल्या आहेत

इयत्ता १० वी आणि १२ वी ची परीक्षा ‘ऑफलाईन’ होणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा झाल्यानंतर १५ दिवसांनी त्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेच्या अंतर्गत त्यांचा गृहपाठ सादर करायचा आहे. कोरोनामुळे यामध्ये काही अडचण आल्यास त्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल.

सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित होणार्‍या संदेशाला बळी पडू नका ! – श्रीमती ए.एस्. कांबळे

१ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ज्या घरातील २१ ते ७० वर्षे या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे अशा विधवा महिलांना महिला आणि बालविकास विभागाच्या जिजामाता योजनेअंतर्गत ५० सहस्र रुपये मिळतील…..

दत्तात्रेय होसबळे रा.स्व. संघाचे नवे सरकार्यवाह

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मावळते सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत होसबळे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यांची एकमताने निवड झाली.