पुरातत्व विभागाच्या हलगर्जीमुळे ओडिशातील ऐतिहासिक २ खांब तुटले !

भारतातील हिंदूंची पुरातन धार्मिक स्थळे, मंदिरे आदींची हेळसांड झाल्यामुळे त्यांची दुरवस्था झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. ऐतिहासिक वस्तू आणि वास्तू यांविषयी संवेदनशून्य आणि गांभीर्य नसलेला हा विभाग विसर्जित करून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

श्री. अनिल धीर

भुवनेश्‍वर (ओडिशा) – येथील लिंगराज मंदिराच्या जवळ असलेल्या शिवतीर्थ मठाचा परिसर खोदतांना सापडलेले ४ खांब उचलून ठेवतांना त्यांतील २ खांब तुटले, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. अनिल धीर यांनी दिली. यांतील प्रत्येक खांब २० फूट लांबीचा असून त्याचे वजन १५ टन आहे. असे खांब विरळ असतात.

हे खांब सापडल्यावर त्याची माहिती श्री. धीर यांनी संबंधित खात्याला दिली आणि हे खांब सुरक्षित ठेवण्याची विनंती केली. त्याप्रमाणे विभागाने ते खांब उचलून नेण्याची व्यवस्था केली; मात्र त्यांच्या हलगर्जीमुळे त्यातील २ खांब तुटले. (पुरातन वस्तू हाताळण्याविषयी पुरातत्व विभाग किती निष्काळजी आहे, हेच यातून पुन्हा एकदा दिसून आले ! – संपादक)