Telangana Police Advisory On Holi : भाग्यनगर (तेलंगाणा) शहरात होळी न खेळणार्‍यांना रंग लावल्यास शिक्षा होणार !

दुचाकी आणि इतर वाहने यांच्या वाहतुकीवर बंदी

भाग्यनगरचे पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंद

भाग्यनगर (तेलंगाणा) – होळी खेळण्याविषयी भाग्यनगरचे आयुक्त सी.व्ही. आनंद यांनी आदेश प्रसारित केला आहे. यात म्हटले आहे की,  शहरातील सार्वजनिक ठिकाणी होळी न खेळणार्‍या व्यक्ती, ठिकाणे आणि वाहने यांवर गुलाल किंवा रंगीत पाणी फेकल्याने त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. रस्त्यांवर दुचाकी आणि इतर वाहने यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर भाग्यनगर शहर पोलीस कायद्याच्या कलम ७६ अंतर्गत कारवाई केली जाईल. यात ५० रुपये दंड किंवा ८ दिवसांपर्यंत कारागृहवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. कायद्यात एक महिन्यापर्यंत कारावास किंवा १०० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षांचे प्रावधान आहे. या सूचनेनंतर शहरात वाद निर्माण झाला आहे. सायबराबादचे पोलीस आयुक्त अविनाश मोहंती यांनीही असाच आदेश प्रसारित केला आहे.

ईद साजरी करण्यावर कोणतेही बंधन नाही, मग हा भेदभाव का ? – भाजप

भाजपने या आदेशावर टीका केली आहे. भाजपच्या तेलंगाणा शाखेच्या एक्स खात्यावर म्हटले आहे की, ईद साजरी करण्यावर कोणतेही बंधन नाही, कोणतेही निर्बंध नाहीत. असा भेदभाव का ?

काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी ९ वे निजाम ! – आमदार टी. राजासिंह यांची टीका

टी. राजासिंह

भाग्यनगरमदील गोशामहल येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह या आदेशावर म्हणाले की, तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यापासून हिंदु मंदिरांवर आक्रमणे होत असून हिंदू सणांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारने भाग्यनगरच्या तलावात श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यावर बंदी घातली होती आणि दिवाळी साजरी करण्यावर निर्बंध लादणारी मार्गदर्शक सूचनादेखील प्रसारित केली होती. रमझानमध्ये लोकांचे मोठे मेळावे आणि रात्री उशिरापर्यंतचे कार्यक्रम असूनही असे कोणतेही निर्बंध लादले गेले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की, ‘मी ८ वा नाही तर ९ वा निजाम आहे;’ कारण ८ वे निजाम के.सी.आर् (माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव) होते.’ निजामाची सवय हिंदूंवर अत्याचार करणे, ही होती, त्याचे काम हिंदू सणांवर बंदी घालणे, हे होते.

संपादकीय भूमिका

या आदेशानंतर मुसलमान हिंदूंवर खोटा आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडतील, अशीच व्यवस्था काँग्रेसने केली आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही !