Death Sentences Dilsukhnagar Blast Convicts : भाग्यनगर येथे वर्ष २०१३ मध्ये झालेल्या बाँबस्फोटातील ५ जिहादी आतंकवाद्यांची फाशीची शिक्षा कायम !

तेलंगणा उच्च न्यायालयाचा निर्णय

भाग्यनगर (तेलंगाणा) – भारताने बंदी घातलेल्या ‘इंडियन मुजाहिदीन’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ५ आतंकवाद्यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा तेलंगणा उच्च न्यायालयाने कायम ठेवली. वर्ष २०१३ मध्ये भाग्यनगरमधील दिलसुखनगर येथे झालेल्या २ बाँबस्फोटांत हे आतंकवादी सहभागी होते. या स्फोटात १८ जणांचा मृत्यू झाला होता, तर १३१ जण घायाळ झाले होते.

१३ डिसेंबर २०१६ या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाने इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक महंमद अहमद सिद्दीबापा उपाख्य यासिन भटकळ, पाकिस्तानी नागरिक झिया-उर-रहमान उपाख्य वकास, असदुल्ला अख्तर उपाख्य हड्डी, तहसीन अख्तर उपाख्य मोनू आणि एजाज शेख यांना दोषी ठरवले होते.

संपादकीय भूमिका

  • वर्ष २०१३ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणाचा वर्ष २०२५ मध्ये लागलेला निकाल हा न्याय नव्हे, तर अन्यायच होय !
  • आता हे आतंकवादी सर्वाेच्च न्यायालयात याला आव्हान देतील. तेथे किती वर्षांनी निर्णय येईल ?, हे सांगता येत नाही. तेथेही फाशी कायम राहिली, तर राष्ट्रपतींकडे दयेची याचिका प्रविष्ट (दाखल) केली जाईल. त्यावर किती दिवसांत निर्णय होईल ?, हे ठाऊक नाही. याचिका फेटाळल्यावर फाशीची कार्यवाही (अंमलबजावणी) कधी होईल ?, हेही सांगता येत नाहीत.