
जालंधर (पंजाब) – येथे ७ एप्रिलच्या रात्री भाजपचे नेते मनोरंजन कालिया यांच्या घरातील बाँबस्फोटाच्या प्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. या स्फोटामागे झीशान अख्तर असून त्याने पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.च्या सांगण्यावरून हा स्फोट घडवला. तो कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा जवळचा सहकारी आहे.