|

जालंधर (पंजाब) – येथील नांगल गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. बंदी घातलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’चा प्रमुख असणारा आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने या घटनेचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. या पुतळ्यावर ‘खलिस्तान झिंदाबाद’ ‘शीख हिंदू नाहीत’ असे लिहिण्यात आले आहे. तसेच येथे खलिस्तानचा झेंडाही फडकावण्यात आला.
पन्नू याने १४ एप्रिल या दिवशी राज्यभरातील डॉ. आंबेडकर यांचे पुतळे हटवण्याची घोषणाही केली आहे. ‘भारताच्या राज्यघटनेमुळेच या देशात शिखांना कोणतेही अधिकार मिळाले नाहीत’, असा दावा पन्नू याने केला आहे.
यापूर्वी जानेवारीमध्ये अमृतसरमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. तथापि ज्याने हे कृत्य केले तो दलित असल्याचे निष्पन्न झाले.
संपादकीय भूमिकापंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! येथील आम आदमी सरकारच्या विरोधात देशातील राजकीय पक्ष का बोलत नाहीत ? |