Padri Bajinder Singh Threaten Woman : पीडितेने पोलिसात तक्रार केल्याने वासनांध पाद्रयाने तिला मारली थप्पड !

वर्ष २०१८ मध्येही अन्य महिलेवर बलात्कार केल्याने भोगला आहे तुरुंगवास !

पाद्री बजिंदर सिंह

जालंधर (पंजाब) – चमत्कारांद्वारे आजार बरे करण्याचा दावा करणारा जालंधर येथील पाद्री बजिंदर सिंह याने एक महिला आणि तरुण यांना थप्पड मारल्याचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांत प्रसारित होत आहे. हा व्हिडिओ १४ फेब्रुवारीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बजिंदर सिंह याच्या चंडीगड येथील कार्यालयात घडली. संबंधित महिलेने पाद्रयावर तिचा विनयभंग केल्याचा आरोप केला होते आणि यासंदर्भात पोलिसात तक्रारही दिली होती. यामुळे त्याने कार्यालयात आलेल्या त्या महिलेवर अशा प्रकारे वर्तन केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे अनुयायी त्याला ‘येशू-येशूवाले धर्मगुरु’ म्हणून संबोधतात.

१. या व्हिडिओमध्ये रागाने अनावर झालेला पाद्री बजिंदर सिंह त्याच्या कार्यालयात आलेल्या एका तरुणावर आधी दूरभाष आणि नंतर बॅग फेकतो. नंतर त्याला थप्पड मारतो. त्यांनतर त्याने आधी विनयभंग केलेल्या पीडित महिलेवर पुस्तक फेकतो आणि नंतर थप्पड मारतो. या व्हिडिओवर बजिंदर सिंह याने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

२. पाद्री बजिंदर सिंह कर्करोगासारखे आजार बरे करण्याचा आणि मृतांना पुन्हा जिवंत करण्याचा दावा करतो. त्याच्या कार्यक्रमांना अनेक चित्रपट अभिनेतेही उपस्थित असतात.

३. त्याच्यावर वर्ष २०१८ मध्येही एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. पुढे त्या महिलेने आरोप मागे घेतले.

संपादकीय भूमिका

हिंदु संतांवर कथित बलात्काराचे आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर चिखलफेक करणारी प्रसारमाध्यमे, पुरो(अधो)गामी आदी अहिंदु धर्मगुरूंवर अशा प्रकारचे आरोप झाले की गप्प बसतात. या महाभागांच्या या भयाणशांततेवरून त्यांना हिंदूंनी आता जाब विचारून त्यांची भूमिका मांडण्यास भाग पाडले पाहिजे !