Punjab Woman Constable Arrested : पंजाब पोलीस दलातील महिला पोलीस शिपायाला अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणी अटक

महिला पोलीस शिपाई अमनदीप कौर

भटिंडा (पंजाब) – पंजाब पोलीस दलातील महिला पोलीस शिपाई अमनदीप कौर हिला १७ ग्रॅम हेरॉईनसह रंगेहाथ अटक करण्यात आली. अमनदीप कौर तिच्या थार चारचाकी वाहनातून अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी हरियाणा येथे जात असतांना तिला अटक करण्यात आली. पोलिसांनी थार गाडीही जप्त केली आहे.

संपादकीय भूमिका

आधी पोलीस आणि त्यात महिला असतांना अशा प्रकारची गुन्हेगारी केली जाणे, हे म्हणजे ‘पुढारलेपणा’चे लक्षण समजायचे का ?