नांदेड जिल्ह्यातील नायगाव धरण गावातील इयत्ता चौथीतील विद्यार्थी प्रतीदिन मद्य पिऊन धिंगाणा घालतात !  

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! लहान मुले आणि पुरुष यांनी मद्य पिऊन घरातील महिलांना त्रास देणे असे गंभीर चित्र गावात निर्माण होणे, हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दृष्टीने लज्जास्पद !

विदिशा (मध्यप्रदेश) येथील परमार वंशाच्या प्राचीन राजमहालावर धर्मांधांचे नियंत्रण प्रशासनने हटवले !

राजमहालावर धर्मांध नियंत्रण मिळवेपर्यंत प्रशासन काय करत होते ? पुरातत्व विभाग इतकी वर्षे काय करत होता ? हिंदूंनी अशा प्रकारे नियंत्रण मिळवले असते, तर लगेच या विभागाने हिंदूंना तेथून हाकलून लावले असते !

गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी एका जाती समूहाने २८ सहस्र पेशवे सैनिकांना कापले, हा इतिहास खोटा ! – अधिवक्ता शिवाजी कोकणे 

कोरेगाव भीमा येथे झालेली लढाई ही पेशवे विरुद्ध एक विशिष्ट जाती समूह यांच्यात झालेली नव्हती. तसे कोणतेही पुरावे इंग्रजांच्या तत्कालीन नोंदींमध्ये नाहीत.

(म्हणे) ‘काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावेही पालटतील !’ – जावेद अख्तर, गीतकार

चीन भारताचा शत्रू आहे. अख्तर यांना शत्रूच्या देशाची संस्कृती दर्शवणारे फळाचे नाव मिरवण्यात धन्यता वाटत असेल, तर त्यांची निष्ठा शत्रूच्या देशाशी आहे, असेच समजावे का ? अशा राष्ट्राभिमानशून्य आणि शत्रूप्रेमी कलाकारांची भारताला आवश्यकता नाही !

पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू ! – महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे

या आगीच्या प्रकरणी घातपाताचा संशयाच्या दृष्टीने केंद्रीय यंत्रणांकडून तपास चालू करण्यात आला असून माहिती घेण्यात येत आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांच्या आश्रमात चांदीच्या पादुका आणि चंदनाच्या झाडांची चोरी

मध्यप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! भाजपचे राज्य असतांना अशा घटने घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

भ्रमणभाष खरेदीसाठी १० सहस्र रुपये न दिल्याने धर्मांध मुलाकडून सावत्र आईची गळा दाबून हत्या !

धर्मांधांची हिंसाचारी मनोवृत्ती ! मेरठ (उत्तरप्रदेश) येथे भ्रमणभाष खरेदी करण्यासाठी पैसे न दिल्याने स्वतःच्या सावत्र आईची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर याची वडिलांना माहिती दिली आणि तो पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दुसर्‍या टप्प्यांत पंतप्रधान, सर्व मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचे लसीकरण होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार, तसेच आजार असणारे अन्य राजकीय नेते यांचे लसीकरण केले जाणार आहे.

ठाणे येथे बसने तरुणाला १०० मीटर फरफटत नेणार्‍या धर्मांध बसचालकावर गुन्हा नोंद

हिंदूंनो, धर्मांध वाहनचालकांची मुजोरी जाणा ! धर्मांध रिक्शा किंवा बस चालक बहुसंख्येने असणार्‍या हिंदु प्रवाशांचे प्राण घेणारे अपघात घडवण्याचे दुःसाहस सहजतेने करतात. धर्मांधांना या देशात कुणाचाच धाक नसल्याचे हे द्योतक आहे !

अन्वय नाईक यांच्याकडून घेतलेल्या मालमत्तांचे खरे मूल्य मुख्यमंत्र्यांनी घोषित करावे – डॉ. किरीट सोमय्या

मुख्यमंत्र्यांनी अन्वय नाईक यांच्याकडून घेतलेल्या मालमत्तांचे खरे मूल्य घोषित करावे, अशी मागणी भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.