ठाणे येथे बसने तरुणाला १०० मीटर फरफटत नेणार्‍या धर्मांध बसचालकावर गुन्हा नोंद

  • हिंदूंनो, धर्मांध वाहनचालकांची मुजोरी जाणा ! धर्मांध रिक्शा किंवा बस चालक बहुसंख्येने असणार्‍या हिंदु प्रवाशांचे प्राण घेणारे अपघात घडवण्याचे दुःसाहस सहजतेने करतात. धर्मांधांना या देशात कुणाचाच धाक नसल्याचे हे द्योतक आहे !
  • धर्मांधांची ही मुजोरी हे काँग्रेस सरकारच्या ७० वर्षांच्या लांगूलचालनाचेच अंतिम परिणाम आहेत !

ठाणे – येथील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मिनी बसचालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत एका तरुणाला १०० मीटर फरफटत नेल्याची घटना घडली. यानंतर कासारवडवली पोलिसांनी घायाळ झालेल्या तरुणाला खासगी रुग्णालयात भरती केले. या प्रकरणी बसचालक मन्सूर अली याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पीडित तरुण बसचालकाशी बोलत असतांना वाद झाला. त्याच वेळी बसचालकाने बस चालू करीत भरधाव वेगाने पुढे नेली. त्या वेळी बसला धरून उभा असलेला तरुण १०० मीटर बससोबत फरफटत गेला.

वाहतूक पोलिसांच्या आणि परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे बसचालकांची ही मुजोरी मोडली जात नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केल्यास अशा प्रकाराला आळा बसू शकतो, अशा प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त होत आहेत.