मुंबई विद्यापिठातील मुलींच्या वसतीगृहात ८ मासांपासून पाणीच नाही !

मुलींच्या वसतीगृहात पाण्याची कमतरता असेल, तर पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. (८ मासांनंतर असे निर्देश देणार्‍या विद्यापीठ प्रशासनाचा गलथान कारभार !)

हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्‍या सनातन संस्थेसारख्या अनेक संस्थांची आवश्यकता ! – पू. कृष्णात डोणे महाराज (वाघापुरे महाराज)

हिंदु राष्ट्राचे कार्य काळाची आवश्यकता असून त्याला यश प्राप्त होईल. हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्‍या सनातन संस्थेसारख्या अनेक संस्थांची आवश्यकता असून यापुढील काळात हे कार्य वृद्धींगत होईल.

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला विरोध करण्यामागे षड्यंत्र ! – निर्माते विपुल शहा

या चित्रपटाला विरोध करणारे जिहादी आतंकवाद्यांचे समर्थक असून केंद्रशासनाने त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !

धर्मादाय रुग्‍णालयांतील गरिबांसाठीच्‍या राखीव खाटांची माहिती ‘अ‍ॅप’द्वारे मिळणार !

धर्मादाय रुग्‍णालयांमध्‍ये निर्धन आणि आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्‍या जागांपैकी किती खाटा शिल्लक आहेत ?यासाठीचा ‘अ‍ॅप’ प्राधान्‍यक्रमाने सिद्ध करण्‍याचा आदेश आरोग्‍यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी प्रशासनाला दिला आहे.

अल्‍पवयीन मुलीची छेड काढल्‍याप्रकरणी नगर येथे धर्मांधावर गुन्‍हा नोंद !

येथे १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करून छेड काढल्‍याप्रकरणी अमान शब्‍बीर सय्‍यद याच्‍यावर संगमनेर पोलीस ठाण्‍यात पोस्‍को अंतर्गत गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

पुणे जिल्‍ह्यातील अनधिकृत होर्डिंग्‍ज तातडीने काढावेत ! – डॉ. राजेश देशमुख, जिल्‍हाधिकारी

असे आदेश का द्यावे लागतात ? पालिका प्रशासन यावर स्‍वत:हून कारवाई का करत नाही ?

एका सुनियोजित षड्‍यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्‍यता देण्‍याचा प्रयत्न ! – अधिवक्‍ता सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

एका सुनियोजित षड्‍यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्‍यता देण्‍याचा प्रयत्न चालू आहे. एरव्‍ही नियमित खटले, प्रलंबित निकाल देण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाकडे वेळ नाही; मात्र समलैंगिकता विषयासाठी न्‍यायालयाकडे वेळ आहे !

अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्‍यास प्रादेशिक परिवहन मंडळाची टाळाटाळ !

कारवाईची आकडेवारी सांगण्‍यातही चालढकलपणा ! अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्‍यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांचे त्‍यांच्‍याशी संगनमत आहे का ?

पुणे ग्रामीण पोलिसांकडून ‘वारसा स्‍वच्‍छतेचा, मावळा शिवरायांचा’ मोहिमेला प्रारंभ !

अशी मोहीम पोलिसांना का राबवावी लागते ? पुरातत्‍व विभाग काय करत आहे ?

नागपूर येथील एन्.सी.आय. म्‍हणजे मध्‍य भारतातील कर्करोगाच्‍या उपचाराचे आरोग्‍य मंदिर ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

कॅन्‍सर इन्‍स्‍टिट्यूट’मुळे (एन्.सी.आय.) कर्करोगासारख्‍या दुर्धर व्‍याधीने ग्रस्‍त रुग्‍ण आणि त्‍यांचे नातेवाईक यांना दिलासा मिळाला आहे. ही संस्‍था विदर्भासह मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या मध्‍य भारतातील राज्‍यांसाठी आरोग्‍य मंदिर ठरत आहे.असे ते म्‍हणाले.