सिंहगडावर (पुणे) जाण्यासाठी उपद्रव शुल्क रोख स्वरूपात भरण्याची सक्ती !

कोंढणपूर फाट्याजवळ भ्रमणभाषला ‘नेटवर्क’ची समस्या आहे. तरीही ‘ऑनलाईन पेमेंट’ सुविधा उपलब्ध करण्यास काही अडचण नाही. पुढील १० दिवसांमध्ये याविषयी कार्यवाही करू.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिर अध्यात्म आणि संस्कार यांची दिशा देणारे ठरेल ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराप्रती सर्वांची समर्पणाची भावना आहे. प्रत्येक वारकर्‍यांसाठी हे मंदिर अभिमानास्पद आहे.

कोकणात आज रत्नागिरी जिल्ह्याला ‘रेड’ तर अन्य ५ जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट

२७ जुलै या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि रायगड या ५ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

जीवनातील सुखासाठी मातेचा आशीर्वाद सर्वश्रेष्ठ ! – प.पू. माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती

प.पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी तपश्चर्येमधून प्राप्त केलेले आत्मज्ञान प्रसन्नपणे माताजींना प्रदान केले. अशा या माताजी आपल्या पुढ्यात श्रीरामकथेतील गूढ रहस्य ठेवत आहेत, हे आपल्या सर्वांच्या पूर्वसुकृताचेच फळ आहे.

आमदार डॉ. राजन साळवी यांनी विधिमंडळात औचित्याच्या मुद्याद्वारे मांडली भूमिका

रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांचे स्थानांतर (बदल्या) झाल्यानंतर जिल्ह्यात एकूण ७०० पदे रिक्त झाली असून अपूर्ण शिक्षकांच्या संख्येमुळे अनेक शाळा शून्यशिक्षकी झाल्या आहेत.

धुंदरे (लांजा) येथे विश्व हिंदु परिषदेच्या वतीने महिला कार्यकर्त्यांचा संघटन मेळावा

हल्ली ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे भरपूर वाढत आहेत. त्यामुळे घरातील मंडळींच्या स्वत:च्या मुलांच्या भावी आयुष्याबद्दल चिंता वाढत आहे. यासाठी मुलांवर हिंदु धर्माचे संस्कार सातत्याने करत रहा.

राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती केली जाणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

काही वृत्तपत्रांमध्ये राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलीसभरती केली जाणार असल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले होते. याविषयी गृहमंत्र्यांनी विधीमंडळात स्पष्टीकरण दिले.

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे वारकर्‍यांच्या आरोग्याला धोका ! – दिलीप मोहिते पाटील, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे शुद्धीकरण न करता सांडपाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडले जाते. दूषित पाण्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

खासगी जागेत वीजमीटर बसतांना वनविभागाच्या ना हरकत दाखल्याची आवश्यकता नाही ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

खासगी जागेवर घर बांधतांना त्या ठिकाणी वीजमीटर घेण्यासाठी वनविभागाच्या नाहरकत दाखल्याची आवश्यकता नाही. भूमी वनविभागाची नसेल, तर अनुमतीची आवश्यकता नाही.

पीक विमा योजनेत १ लाख शेतकर्‍यांच्या सहभागासाठी प्रयत्नशील ! – भाग्यश्री फरांदे, कृषी अधीक्षक

नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग या कारणांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकर्‍याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी केंद्रशासनाने खरीप हंगाम वर्ष २०२३ साठी ‘पंतप्रधान पिक वीमा योजना’ पुढे चालू ठेवण्यास मान्यता दिली आहे.