वीजदेयक भरणार नाही ! – कोल्हापूर कृती समितीची कोल्हापुरी चपलेच्या फलकाद्वारे चेतावणी

कोल्हापूर कृती समिती वाढीव वीजदेयकांच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात.

बत्तीस शिराळा येथे प्रत्येक गुरुवारी नो व्हेईकल डे !

शिराळा नगरपंचायतीने प्रत्येक गुरुवारी नो व्हेईकल डे ! पाळण्याचे ठरवले आहे.

व्यावसायिक वाहनांचा कर माफ करूनही त्यावरील दंडाच्या रकमेची मागणी

कर माफ झाला असेल, तर दंडाची वसुली कशासाठी ?

७ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांची कोरोना पडताळणी पूर्ण करून टप्प्याटप्प्याने शाळा चालू करण्याचा निर्णय ! – जिल्हाधिकारी दौलत देसाई

२३ नोव्हेंबरपासून शाळा चालू करणे बंधनकारक नाही.

कार्तिकी यात्रेला नियम पाळत अनुमती द्यावी !

आगामी कार्तिकी यात्रेला शासनाने सर्व नियम पाळत अनुमती द्यावी यांसह विविध मागण्यांसाठी कार्तिकी यात्रा समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांसह आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात भाजपचा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना घेराव

आज शासकीय कर्मचार्‍यांना सहस्रो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत वेतन मिळते. असे असतांना वैद्यकीय दाखले आणि शस्त्रक्रिया यांसाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात असतील, तर ते सर्वथा लज्जास्पद आहे !

कोकण रेल्वेमार्गावर हुंबरठ येथे रेल्वेची धडक बसून महिलेचा मृत्यू

कोकण रेल्वेमार्गावरून धावणार्‍या गाडीची धडक बसून तालुक्यातील बौद्धवाडी, हुंबरठ येथील रेल्वेमार्गावर २१ नोव्हेंबरला सकाळी एका महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याने महिलेची ओळख पटलेली नाही.

(म्हणे) ‘महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायद्याची आवश्यकता नाही !’ – अस्लम शेख, पालकमंत्री, मुंबई उपनगर, काँग्रेस

लव्ह जिहादसारख्या फालतू गोष्टींना महाराष्ट्रात थारा नाही. त्यामुळे राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे मुंबई उपनगरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले.

कोल्हापूर येथील सी.पी.आर्. रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवर उपचार चालू !

सी.पी .आर्. रुग्णालयात मागील ६ मासांहून अधिक काळ बंद असलेली वैद्यकीय उपचार सेवा चालू झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.  

कोरेगाव पोलिसांकडून गांजा तस्करांविरोधात धडक मोहीम

कोरेगाव पोलिसांनी गत आठवड्यापासून तालुक्यातील गांजा तस्करांविरोधात धडक मोहीम चालू केली आहे.पोलिसांनी संशयिताकडून ३ लाख रुपयांचा ४९ किलो गांजा कह्यात घेतला आहे.