अकोला येथे जुलुसामध्‍ये धर्मांधांनी आतंकवादी आणि गुन्‍हेगार यांची चित्रे झळकावली !

अकोला – येथे ईदनिमित्त काढलेल्‍या जुलुसामध्‍ये (मुसलमानांच्‍या मिरवणुकीमध्‍ये) सहभागी झालेल्‍या काही मुसलमानांच्‍या हातात ‘हमास’ या आतंकवादी संघटनेचा अबू उबेदा याचे ‘द रियल हिरो, लायन’ (खराा नायक, सिंह) असा मजकूर असलेले मोठे चित्र होते. एका ठिकाणी अल्‍जेरियन हमजा बेंडेलादाज याचेही चित्र होते. त्‍याच्‍यावर अमेरिकेतील २१७ बँका आणि वित्तीय संस्‍था यांच्‍यातील खासगी खाती हॅक करून लाखो यूएस् डॉलर चोरल्‍याचा आरोप आहे. या जुलुसामध्‍ये पोलीस बंदोबस्‍तही मोठ्या प्रमाणात होता. (हिंदूंवर तत्‍परतेने कारवाई करणारे पोलीस धर्मांधांसमोर मात्र नांगी टाकतात, हा पोलिसांचा दुटप्‍पीपणा लक्षात घ्‍या ! आतंकवादाचे समर्थन उघड्या डोळ्‍यांनी पहाणार्‍या पोलिसांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

आतंकवादी आणि गुन्‍हेगार यांची चित्रे मिरवणारे भारतात असणे, ही भारतियांसाठी धोक्‍याची घंटाच !