वायनाड (केरळ) – लेबनॉनमधील हिजबुल्ला या जिहादी आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांकडून पेजरच्या स्फोटांच्या प्रकरणात नॉर्वेस्थित भारतीय वंशाच्या रिन्सन जोस याचे नाव समोर आले होते. तो मुळचा केरळचा आहे. त्याच्या वायनाड येथील निवासस्थानी जाऊन केरळ पोलिसांनी त्याच्या कुटुंबाची चौकशी केली.
LEBANON PAGER BLASTS: Norway based Keralite Rinson Jose under scanner
Kerala Police verify background, family asserts innocence#Israel #LebanonBlasts #PagerBlasts #Indian #Hezbollah pic.twitter.com/l5wf13ccxx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 23, 2024
या प्रकरणी केरळ पोलिसांनी सांगितले की, विशेष शाखेच्या अधिकार्यांनी कुटुंबाची पार्श्वभूमी तपासली. यामध्ये नवे असे काही नाही. अशा प्रकारची वृत्ते जेव्हा येतात, तेव्हा या प्रकारची तपासणी होतच असते.
दुसरीकडे भाजपचे नेते संदीप वेरियार यांनी रिन्सन आणि त्याचे कुटुंबीय यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. रिन्सन या देशाचा सुपुत्र आहे. तो मल्याळी आहे. रिन्सन आणि त्याच्या कुटुंबीय यांना आपण संरक्षण दिले पाहिजे.