कोल्हापूर येथील सी.पी.आर्. रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवर उपचार चालू !

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर

कोल्हापूर – ८ नोव्हेंबर पासून सी.पी.आर्. रुग्णालयात अपघात विभाग आणि तातडीच्या शस्त्रक्रिया तसेच बाल रोग उपचार, प्रसूती उपचार अन् हृदयरोग उपचार अशी नॉन कोविड वैद्यकिय उपचार सेवा चालू झाली आहे. त्यामुळे मागील ६ मासांहून अधिक काळ बंद असलेली वैद्यकीय उपचार सेवा चालू झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.