बत्तीस शिराळा येथे प्रत्येक गुरुवारी नो व्हेईकल डे !

बत्तीस शिराळा (जिल्हा सांगली) – महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत शिराळा नगरपंचायत, पंचमहाभूतांच्या जतन आणि संवर्धनासाठी शिराळा शहर हरित शहर ही मोहीम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून शिराळा नगरपंचायतीने प्रत्येक गुरुवारी नो व्हेईकल डे ! पाळण्याचे ठरवले आहे.

या उपक्रमाचा आरंभ मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी आपल्या निवासस्थानापासून सायकलवरून शिराळा नगरपंचायतपर्यंत केला. या मोहिमेसाठी नगराध्यक्षा सौ. अर्चना शेटे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यावरण आणि वातावरणीय बदल विकास मंत्रालयाकडून २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी नगरपंचायतीच्या वतीने १,५०० झाडे लावण्यात आली आहेत.