कोरेगाव पोलिसांकडून गांजा तस्करांविरोधात धडक मोहीम

३ लाख रुपयांचा ४९ किलो गांजा शासनाधीन

सातारा – कोरेगाव पोलिसांनी गत आठवड्यापासून तालुक्यातील गांजा तस्करांविरोधात धडक मोहीम चालू केली आहे. उपविभागीय पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी खटाव आणि माण तालुक्यातील गांजा तस्करांना गजाआड केल्यानंतर गांजा जेथून पुरवला जातो तेथेच धाड घातली. कोरेगाव पोलिसांनी माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील काळमाळ वस्ती येथून गांजा तस्करी करणार्‍या मुख्य सूत्रधाराला अटक केली. या वेळी पोलिसांनी संशयिताकडून ३ लाख रुपयांचा ४९ किलो गांजा कह्यात घेतला आहे. या प्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.