वीजदेयक भरणार नाही ! – कोल्हापूर कृती समितीची कोल्हापुरी चपलेच्या फलकाद्वारे चेतावणी

कोल्हापूर कृती समितीने शहरात लावलेला वैशिष्ट्यपूर्ण फलक

कोल्हापूर, २१ नोव्हेंबर (वार्ता.) – कोल्हापूर हे नेहमीच आगळ्या-वेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध असते. कोल्हापुरकरांवर बळजोरीने लावलेला पथकर कोल्हापूरकरांनी व्यापक आंदोलनाद्वारे हाणून पाडला. त्याचप्रकारे आता कोल्हापूर कृती समिती दळवळण बंदीच्या काळात आलेल्या वाढीव वीजदेयकांच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. कोल्हापूर शहरात कृती समितीने कोरोना काळातील वीज बिल मागणार्‍या सरकारला, वीज कट करणार्‍याला आणि जनतेवर जबरदस्ती करणार्‍याला खणखणीत झटका..अस्सल कोल्हापुरी तेल लावलेले पायताण, असे लिखाण असलेला फलक लावला आहे. त्यावर वीजदेयकासाठी कोणी बळजोरीने वसुली करर्‍यासाठी आल्यास संपर्कासाठी दूरभाष क्रमांक देण्यात आले आहेत. सहा मासांचे वीजदेयक माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.