कार्तिकी यात्रेला नियम पाळत अनुमती द्यावी !

यात्रा समन्वय समितीसह आमदार सुभाष देशमुख यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

सोलापूर – आगामी कार्तिकी यात्रेला शासनाने सर्व नियम पाळत अनुमती द्यावी यांसह विविध मागण्यांसाठी कार्तिकी यात्रा समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांसह आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. या वेळी यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी, याविषयी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली.

कार्तिकी यात्रेला अनुमती मिळावी, या मागणीसाठी यात्रा समन्वय समितीचे पदाधिकारी ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, ह.भ.प. राणा महाराज वासकर, ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज यांनी आमदार देशमुख यांची भेट घेतली. या वेळी आमदार देशमुख यांनी पदाधिकार्‍यांसमवेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले.

खालील विषयांवर करण्यात आली चर्चा

पंढरपूर येथील प्रत्येक मठात ५० वारकर्‍यांनाच प्रवेश द्यावा. प्रत्येक दिंडीत १० वारकर्‍यांना अनुमती द्यावी. ६५ एकर भूमीवर तंबू, राहुट्या बांधण्यास प्रतिबंध करावा. सामाजिक अंतर राखत चंद्रभागेत स्नानाची सोय करावी. एकादशी दिवशी नगर प्रदक्षिणा ६ ते १२ या वेळेत करावी आणि दुसर्‍या दिवशी महाद्वारकाला छोट्या प्रमाणात साजरा करावा. कोरोना योद्धयांची नियुक्ती करत त्यांद्वारे प्रबोधन करावे, यांसह विविध विषयांवर आमदार सुभाष देशमुख आणि पदाधिकारी यांंनी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली.