
कणकवली – कोकण रेल्वेमार्गावरून धावणार्या गाडीची धडक बसून तालुक्यातील बौद्धवाडी, हुंबरठ येथील रेल्वेमार्गावर २१ नोव्हेंबरला सकाळी एका महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याने महिलेची ओळख पटलेली नाही. कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला अन् मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणून शवविच्छेदन केले. या महिलेविषयी माहिती असल्यास कणकवली पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या मार्गावरून धावणार्या कोणत्या गाडीची धडक बसून महिलेचा मृत्यू झाला, हे समजू शकले नाही.
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा ! – मुख्यमंत्री
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती