१ ते १० मार्च या कालावधीत विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ८ मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार 

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत होणार आहे. ८ मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून ९ आणि १० मार्च या दिवशी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल.

गृहिणीलाच घरातील सर्व कामे करण्यासाठी उत्तरदायी ठरवता येणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

पत्नी म्हणजे एखादी मालमत्ता किंवा वस्तू नाही. घरातील सर्व कामांची अपेक्षा पत्नीकडून करणे चूक आहे. गृहिणीकडूनच घरातील सर्व प्रकारच्या कामांची अपेक्षा केली जाते. ही पती-पत्नीच्या नात्यांमधील असमानता आहे. कोणतेही लग्न हे समानतेच्या तत्त्वावर आधारलेले आहे.

परभणी येथील ४ ग्राहकांकडून १ लाख ५१ सहस्र रुपयांची वीजचोरी !

‘रेडिओ फ्रिक्वेन्सी डेटा कॉन्सेंट्रेटर युनिट’ लावले म्हणून ही वीजचोरी निदर्शनास आली. युनिट न लावल्यामुळे आतापर्यंत अनेक जणांनी वीजचोरी केली असेल, त्याला उत्तरदायी कोण ? यामध्ये महावितरणची लक्षावधी रुपयांची हानी झाली आहे, ती आता कशी वसूल करणार ?

महाराष्ट्रातील प्रवाशांना कोरोना चाचणी अहवाल अनिवार्य; परंतु कर्नाटकच्या बसगाड्यांचा महाराष्ट्रात मुक्त वावर

कोरोना पडताळणी अहवाल असल्याविना कर्नाटकात महाराष्ट्रातील बस प्रवाशांना प्रवेश रहित करण्यात आला आहे; परंतु कर्नाटकातील बसगाड्यांनी महाराष्ट्र हद्दीत प्रवेश करत पुण्यापर्यंत बस फेर्‍या चालवल्या आहेत.

सध्याच्या कोरोना विषाणूमध्ये संसर्ग वाढवण्याचे प्रमाण अधिक ! – डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यात सध्याचा कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरवत असून नागरिकांचा हलगर्जीपणाही त्यासाठी कारणीभूत ठरत आहे, असे मत आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी २४ फेब्रुवारी या दिवशी येथे एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले.

वानवडी (पुणे) येथे गोमांस वाहतूक करणार्‍या वाहनातून १२ गोवंशियांचे मांस पकडले !

गोवंश हत्याबंदी कायदा असूनही गोवंश हत्या थांबलेली नाही ! माता म्हणून पूजल्या जाणार्‍या गोमातेचे रक्षण कायमचे होण्यासाठी हिंदूंचे राष्ट्र निर्माण व्हावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

महाराष्ट्रात मुसलमानांना आरक्षण लागू करण्यासाठी काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत ठराव

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘संकल्प अभियान’ राबवले जाणार आहे. त्याअंतर्गत काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत असा ठराव संमत करण्यात आला.

महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाची तत्कालीन पोलीस महासंचालकांना नोटीस

आंतकवादविरोधी पथकाकडून त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आल्याचे वर्ष २०१८ मध्ये एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यावरून अधिवक्ता आदित्य मिश्रा यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती.

अस्तित्व टिकवायचे असेल, तर हिंदूंनी संघटित होणे, हाच एकमेव पर्याय ! – कपिल मिश्रा, भाजप नेते आणि माजी आमदार, देहली

सद्यःस्थितीत हिंदु संस्कृती, सभ्यता, परंपरा, इतिहास, शौर्य याला अपमानित आणि समाप्त करण्यासाठी देशात प्रतिदिन नवीन षड्यंत्रे रचली जात आहेत. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संकल्पशक्ती, ऊर्जा आणि उत्साह यांनी भारलेल्या हिंदु बांधवांनी आता संघटित व्हायलाच हवे.

हिंदु अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

हिंदूंनो, धर्मांधांच्या तावडीत जाण्यापासून आपल्या मुलींना वाचवण्यासाठी त्यांना वेळीच धर्मशिक्षण द्या !