वानवडी (पुणे) येथे गोमांस वाहतूक करणार्‍या वाहनातून १२ गोवंशियांचे मांस पकडले !

केळीच्या नावाखाली गोमांसाची वाहतूक

पुणे – केळीच्या नावाखाली गोमांसाची वाहतूक करणार्‍या वाहनाला सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेच्या गोरक्षकांनी पकडले. १६ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या या कारवाईमध्ये १२ गोवंशियांचे मांस आणि अवयव वाहनात मिळाले. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. वाहनासंदर्भातील माहिती गोरक्षक निखिल दरेकर यांना मिळाली. गोरक्षक सचिन शित्रे, शादाब मुलाणी, राम वाघमारे यांनी तस्करीचे वाहन रामटेकडी, भैरोबानाला येथे पकडले. गाडीचालक गाडी सोडून पळून गेला. वानवडी मधील सर्व पोलीस अधिकारी अन् पशुवैद्यकीय अधिकारी, गोरक्षक दत्ता भाऊ राऊत, ऋषिकेश कामथे, नीलेश पवार, मयुर शिंदे, अनिकेत दहिवाळे, नितिन निघडे, राजेंद्र गडघूल, जितेंद्र फडतडे यांसह १५ गोरक्षक, तसेच पिपल फॉर अ‍ॅनिमलचे चैतन शर्मा यांनी विशेष सहकार्य केले. (गोवंश हत्याबंदी कायदा असूनही गोवंश हत्या थांबलेली नाही ! माता म्हणून पूजल्या जाणार्‍या गोमातेचे रक्षण कायमचे होण्यासाठी हिंदूंचे राष्ट्र निर्माण व्हावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक)