जळगाव – शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागातील पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षातील ४ विद्यार्थिनी आणि २ विद्यार्थी यांचे रॅगिंग करण्यात आले. द्वितीय वर्षातील ३ विद्यार्थिनींनी त्यांचे रॅगिंग केल्याचे राष्ट्रीय हेल्पलाईनला ईमेलद्वारे कळवण्यात आले. तिन्ही विद्यार्थिनींची चौकशी करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकारॅगिंग करणार्यांना कठोर शिक्षा केल्यासच हे अपप्रकार थांबतील ! |