बांगलादेशातील संतापजनक घटना
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातून गर्भवती हिंदु शिक्षिका शिखा राणी रे यांना तिच्या पदाचे त्यागपत्र न दिल्याने त्यांना गंभीर अपमानाला सामोरे जावे लागले. त्यांना मारहाण करून त्यांची रस्त्यावरून धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. यावरून लोकांनी टीका करत संबंधितांवर कारवाई करण्याची, तसेच मानवाधिकार संघटनांनी या घटनेची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Bangladesh Hindu Teacher Assaulted: Pregnant Hindu Teacher Shikha Rani Ray paraded on the streets for refusing to resign!
Shocking incident from #Bangladesh#HindusAreNotSafeInBangladesh & have no one to support them in this world!@UNGeneva @MEAIndiapic.twitter.com/aMzlmvzHRA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 28, 2024
मुख्य शिक्षक महंमद बिलाल याने शिखा राणी रे यांना त्या हिंदु असल्याचे सांगत त्यांना पदाचे त्यागपत्र देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. शिखा राणी रे यांना त्यागपत्र देण्यास भाग पाडले जात होते. त्यांनी या अन्यायाविरोधात आंदोलन करून त्यागपत्र देण्यास नकार दिला. त्यानंतर वरील घटना घडली.
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदूंना जगात कुणीच वाली नाही ! |