Karnataka High Court : कर्नाटक उच्च न्यायालयाकडून ‘भारतमाता की जय’ म्हणणार्‍यांविरुद्ध नोंदवलेला गुन्हा रहित !

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘भारतमाता की जय’ म्हटल्याच्या प्रकरणी मुसलमानांनी केलेल्या तक्रारीवरील ५ जणांच्या विरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हा कर्नाटक उच्च न्यायालयाने रहित केला. उच्च न्यायालयाने म्हटले की, ‘भारतमाता की जय’ची घोषणा देणे, हे द्वेषयुक्त भाषण नाही आणि ‘धर्मांमधील विसंगती किंवा शत्रुत्व वाढवणारा’, असाही त्याचा अर्थ लावला जाऊ शकत नाही.

कर्नाटकातील उल्लाल तालुक्यातील ५ रहिवाशांविरुद्ध पोलिसांनी यावर्षी जूनमध्ये गुन्हा नोंदवला होता. हे ५ जण ९ जूनच्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमातून परतत असतांना त्यांच्यावर मुसलमानांनी आक्रमण केले होते. या प्रकरणी पीडितांनी पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर मुसलमानांनीही घोषणा देणार्‍यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.

संपादकीय भूमिका

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने ‘भारतमाता की जय’ म्हणणार्‍यांवर गुन्हा नोंद होणे आश्‍चर्यकारक नाही ! अशा काँग्रेसला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना हे लज्जास्पद !