वसई – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे गावातील आनंदवाडी वळणावर १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी घरी जात होती. वसई वाहतूक पोलीस शाखेत कार्यरत असणारे ५ पोलीस शिपाई गोव्याला खासगी वाहनाने सहलीसाठी जात होते. पोलीस शिपाई हरिराम गीते याने तिला ‘माझ्यासमवेत येतेस का ? तुला वसई फिरवतो’, असे म्हटले. वाहनातील अन्य पोलिसांनीही या तरुणीची टिंगलटवाळी करून तिची छेड काढली. ती दुर्लक्ष करून जात असतांना या पोलिसांनी तिचा हात ओढून तिला बळजोरीने गाडीत बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार समजताच आसपासचे ग्रामस्थ गोळा झाले. त्यांनी या पोलिसांना बेदम चोप दिला आणि देवगड पोलिसांच्या कह्यात दिले. देवगड पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार समजताच पोलीस आयुक्त सुहास बावचे यांनी पोलीस शिपाई हरिराम गिते आणि प्रवीण रानडे या दोघांना सेवेतून निलंबित केले आहे.
२४ सप्टेंबर या दिवशी येथे ही घटना घडली. आरोपींपैकी २ वाहतूक शाखेत, १ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सी.आय.एस्.एफ्.) आणि १ राज्य राखीव पोलीस दल (एस्.आर्.पी.एफ्.) येथे कार्यरत आहे.
संपादकीय भूमिकातरुणीची छेड काढून तिचे अपहरण करणारे पोलीस मुली आणि महिला यांचे रक्षण कधी तरी करतील का ? २ नव्हे, तर त्या वेळी बघ्याची भूमिका घेणार्या अन्य पोलिसांनाही कठोर शासन केले पाहिजे ! |