उज्जैन (मध्यप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठांवर दगडफेक करणार्‍या धर्मांधाचे अवैध घर पालिकेकडून उद्ध्वस्त !

हे घर बांधेपर्यंत पोलीस आणि नगरपालिका यांचे अधिकारी झोपले होते का ? जर या घरावरून दगडफेक झाली नसती, तर पोलीस आणि नगरपालिका यांनी अशी कारवाई केली नसती ! अवैध घरांकडे दुर्लक्ष करणार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !

उज्जैन येथे नाथ संप्रदायाच्या पंच पीर समाधीला हिरवा रंग देऊन ती बळकावण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधांना साधूंनी हाकलवून लावले !

मोगलांच्या काळात थेट हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आक्रमण करण्यात येत होते. तर आताच्या काळात अशा प्रकारे लपूनछपून ती कह्यात घेण्याचे काम केले जात आहे !

उज्जैनमधील मुसलमानबहुल भागात हिंदूंनी आयोजित केलेल्या फेरीवर धर्मांधांकडून दगडफेक !

गेली कित्येक शतके हिंदूंवर धर्मांधांकडून अत्याचार होत आहेत. याचे कारण हिंदूंच्या वृत्तीत पालट झाला नाही. हिंदूंनी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवले असते, तर हिंदूंवर अशी वेळ आली नसती !

मध्यप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायद्याला राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

एकेक राज्यांनी असा कायदा करण्यापेक्षा केंद्र सरकारनेच तसा कायदा करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

उज्जैनच्या महाकालेश्‍वर मंदिर परिसरात उत्खननात सापडले १ सहस्र वर्षे प्राचीन मंदिर !

इस्लामी आक्रमणाच्या वेळी मंदिर पाडून त्यावर भराव घातल्याची शक्यता !

शेतकर्‍यांना हमीभाव देण्याची व्यवस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होणार नाहीत !

पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायद्यांविषयी निर्माण करण्यात आलेला भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. ‘कृषी कायद्यांमध्ये सुधारणांवरून विरोधकांना त्रास होत नाही, तर ‘हे मोदी यांनी का केले ?’ यावरून त्रास होत आहे’, असा आरोपही त्यांनी केला.

मध्यप्रदेशातील शेतकर्‍याच्या अभिनव प्रयोगाला यश !

असा प्रयोग प्रत्येक शेतकर्‍याने करण्याचा प्रयत्न करावा; मात्र तो करतांना सात्त्विक आणि भारतीय संगीत ऐकवावे. भक्तीगीते, संताची भजने लावल्यास त्याचा अधिक लाभ होईल !

शेतकरी आंदोलन पंजाब आणि हरियाणा राज्यांतील उच्च दर्जाचे दलाल चालवत आहेत !  

पंजाब आणि हरियाणा राज्यांतील उच्च दर्जाचे दलाल नियोजित पद्धतीने शेतकरी आंदोलन चालवत आहेत. साम्यवादी विचारसरणीचे लोक आणि ‘टुकडे – टुकडे गँग’ यामध्ये सहभागी झाली असून शेतकर्‍यांच्या परिस्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे

काँग्रेस आणि साम्यवादी पक्ष शेतकर्‍यांच्या वेशात आंदोलनात सहभागी होऊन संभ्रम निर्माण करत आहेत ! – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

‘पंजाबमधील काँग्रेस सरकारने हे नवीन कृषी कायदे लागू केलेले नाहीत. तरीही पंजाबमधील लोक देहलीमध्ये येऊन आंदोलन का करत आहेत ?’ – साध्वी प्रज्ञासिंह

लव्ह जिहादमध्ये हात असल्याचे आढळल्यास मशीद, मदरसे यांना मिळणारे सरकारी साहाय्य रहित होणार  

मध्यप्रदेश सरकार लव्ह जिहादविरोधी कायदा बनवत आहे. ‘धर्मस्वातंत्र्य’ असे या विधेयकाचे नाव असणार आहे.